Delhit Shtakaryanche Aandolan
दिल्लीत उस उत्पादकांचं आंदोलन
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली पण पहिला दिवस गाजला तो ऊसाच्या किंमती ठरवणाऱ्या सिस्टिमच्या विरोधानं. दिल्लीत लोकसभेत एकीकडे खासदार आवाज उठवत असतानाच दुसरीकडे ऊसाच्याच किंमतीवर संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारनं ऊसाचं कमीत कमी मुल्य ठरवलंय त्याला विरोध म्हणून आज सर्व विरोधीपक्षांनी संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ केला.
सरकारच्या धोरणांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. समाजवादी पार्टीचे मुलायमसिंग यादव,राष्ट्रीय लोक दलाचे अजितसिंग यांनी सरकारच्याविरोधात रान उठवायला सुरुवात केली. त्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या खासदारांनीही सरकारच्या ऊस धोरणावर सडकून टीका केली, घोषणाबाजी केली.
महाराष्ट्रातून स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांनीही सरकारच्या ऊसधोरणाला संसदेत विरोध केला.
साखरेचे भाव वाढताहेत पण ऊसाला किंमत का नाही, असा सवालही नेत्यांनी सरकारसमोर उभा केलाय. विरोधकांच्या गदारोळानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दक्षिण भारतातल्या शुगर बेल्टमधल्या खासदारांनीही सरकारच्या मुल्य धोरणाला संसदेत विरोध केला. तर दिल्लीचे रस्तेही आज जाम झाले.
उत्तरप्रदेशसह देशभरातून जवळपास 15 हजार शेतकरी दिल्लीत जमले आणि त्यांनी ऊसाच्याच सरकारी धोरणाला विरोध म्हणून संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशचे शेतकरी नेते महेंद्रसिंग टीकेतयांच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकत्र आले होते